हरियाणा: ऊस उत्पादकांना लवकरच थकबाकी मिळणार, साखर कारखान्यांना मिळाले ३१५ कोटी

हरियाणा सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळीत हंगाम २०२०-२१ साठी एकूण थकबाकी देण्यासाटी ३१५ कोटी रुपये कर्जाच्या रुपात पुरवले आहेत. आता कारखाने हे पैसे शेतकऱ्यांना देणार आहेत.

याशिवाय, सरकारने साखर कारखान्यांना ४७ कोटी रुपयांची सबसीडी दिली आहे. सरस्वती साखर कारखान्याच्या अनुदानाचाही यात समावेश आहे. अतिरिक्त मुख्य सचिव संजीव कौशल यांनी ही माहिती दिली. पानीपत सहकारी साखर कारखान्याला ३४.५० कोटी रुपये तर रोहतक कारखान्याला १४.६० कोटी रुपये मिळाले आहेत. शाहदाब कारखान्याला ३२.७० कोटी रुपये तर जिंद कारखान्याला २०.६० कोटी रुपये मिळाले आहेत. पलवल, महम, कैथल, गोहाना कारखान्यांनाही अनुदान मंजूर झाले आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here