तामिळनाडू मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ऊसतोड मजूरांनी केली घरी जाण्याची मागणी

117

मदुराई : तामिळनाडू च्या थैनी मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील जवळपास 80 साखर कारखाना कामगारांनी शुक्रवारी घरी जाण्यासाठी मागणी केली.

लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील मजुरांना एका खाजगी इमारतीत ठेवण्यात आले आहे, तिथेच या मजुरांनी अधिकार्‍यांकडे घरी जाण्याची मागणी केली. स्थानिक प्रशासनाकडून त्यांना अश्‍वासन देण्यात आले की, त्यांना लवकरच सुखरुप घरी पोचवले जाईल. अधिक़र्‍यांनी सांगितले की, राष्ट्रीय लॉकडाउन पूर्वी, साखर कारखान्यात काम करण्यासठी हे मजूर आपल्या कुटुंबासह इथे आले होते. कराराच्या आधारावर ऊस तोड मजूर काम करत होते.

कारखाना व्यवस्थापनाने मजूरांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली होती, पण लॉकडाउन ने त्यांना इथेच राहण्यासाठी मजबूर केले. कोरोना मुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली. वेळेवर आरोग्य टीम कडून त्यांची स्क्रीनिंग करण्यात आली होंती. तसेच, शेतकर्‍यांची मागणी आहे की, त्यांना घरी जावू द्यावे. त्यांना साखर कारखाना परिसरामध्ये आणण्यात आले जिथे अधिकार्‍यांनी लवकरच त्यांना घरी पाठवण्याचे आश्‍वासन दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here