कोल्हापूरात उसाला पोषक वातावरण

कोल्हापूर, दि. 10 : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सध्या पडणारा पाऊस उसासाठी पोषक ठरत आहे. सलग होणाऱ्या धुव्वाधार पावसानंतर एक दिवसाची पूर्ण उघडीप मिळत असल्याने उसाची वाढ होण्यास आणि त्यामध्ये सर्करेचे प्रमाण वाढण्यास हे वातावरण चांगले आहे.
कोल्हापूर विभागाने यावर्षी 2 कोटी 14 लाखाहून अधिक टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान, पुढील हंगामात (2019-20) मध्ये उसाचे क्षेत्र दहा ते पंधरा टक्‍क्‍याने वाढले आहे. साखर कारखान्यांना तशी नोंदही झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाचे उत्पादन वाढणार असल्याचेच चित्र असताना आता उसासाठी अपेक्षीत पाऊस आणि वातावरण असल्यामुळे उसाचा गोडवा वाढण्यास मदत होणार आहे. गेल्यावर्षी याच दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील नदी काठी असणारा ऊस पुराच्या पाण्याखाली गेला होता. असे हजारो हेक्‍टर उसाला फटका बसला होता. यावर्षी तशी परिस्थिती दिसून येत नाही. याशिवाय, जिल्ह्यात वाढलेल्या उसाच्या क्षेत्रासह सर्वच ठिकाणी उसाचे दमदार पिक डोलत आहे. कधी उन तर कधी पाऊस अशा परिस्थिती उसाची वाढ जोमाने होत आहे.

SOURCEChiniMandi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here