गन्ना मास्टर ॲपमुळे बदलतेय शेतकऱ्यांचे जीवन

कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी डिजिटल जगासोबत चालताना ॲपचा वापर करुन आपले नशिब बदलत आहेत. गन्ना मास्टर असे या ॲपचे नाव आहे. याबाबत इंडियन एक्‍स्‍प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शुगरकेन मास्टर ॲपचे पहिले ग्राहक बनण्याचा विश्वजित सावंत यांचा निर्णय त्यांच्या अनुभवावर आधारित होता. तसेच “१०० टन प्रती एकर” ऊस उत्पादक क्लबमध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा होती. व्यवसायाने वकील असलेले सावंत हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नुल गावात १२ एकरमध्ये ऊस पिक घेतात. सावंत म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून ते विशेष गन्ना मास्टर ऊस उत्पादक किट (एक विशिष्ट उत्पादन, त्याचा उद्देश ऊस वाढीचा असून प्रती एकर उत्पादन आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे) वापरत आहेत. ॲपच्या “चांगल्या परिणामांमुळे” आता सावंत यांना सांगलीस्थित कंपनी गन्ना मास्टरने २४ एप्रिल रोजी लाँच केलेल्या नवीन समुपदेशन ॲपसाठी साइन अप करण्यास प्रवृत्त केले आहे.

गन्ना मास्टरचे सीईओ आणि संचालक अंकुश चोरमुले यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वपूर्ण आणि नेहमी दुर्लक्षीत केली जाणारी बाब म्हणजे त्यांचे बजेट होय. आमच्या ॲपवर एक असा डॅशबोर्ड आहे, जो शेतकऱ्यांना त्यांच्या हंगामाच्या सुरुवातीला बजेट ठरविण्याची परवानगी देतो. हा डॅशबोर्ड अपडेट होत असतो. शेतकरी आपला दैनंदिन खर्च त्यावर अपडेट करतात. हंगामाच्या अखेरीस त्यांनी आपल्या बजेटइतका खर्च केला आहे की नाही, याची पडताळणी करणे शक्य होते.

एकदा शेतातील ऊस पिक जिओ टॅग केले आणि ॲपमध्ये प्रवेश केला की शेतकऱ्यांना खते, फवारणी आदीची माहिती पाठवली जाते. हवामानाच्या अपडेट्सबाबतही हे ॲप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. ॲप जगभातील ग्राहकांना ऊस उत्पादनाबाबत माहिती, बातम्या आणि अपडेट देते. चोरमुले म्हणाले की, आम्ही कृषी रसायने आणि सर्वोत्तम पद्धती विषयी जागरुकता वाढवू इच्छितो. त्यातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन मदत मिळेल. ॲप लाँच झाल्यानंतर २०० पेड सबस्क्रिप्शन झाली आहेत.

वकील आणि ऊस उत्पादक सावंत म्हणाले की, पूर्वी मी प्रती एकर सरासरी ५५ ते ६० टन उत्पादन घेत होतो. मात्र, जेव्हा मी गन्ना मास्टरच्या उत्पादनांचा आणि मार्गदर्शनाचा वापर सुरू केला, तेव्हा हे उत्पादन प्रती एकर ८०-९० टनापर्यंत पोहोचले. सावंत यांच्या म्हणण्यानुसार, ते आपला ऊस लगतच्या कागल तालुक्यातील दोन साखर कारखान्यांना विक्री करतात. ते म्हणाले, या ॲपचा सदस्य झाल्यामुळे मला केवळ आपले बजेट निश्चित करण्याची संधी मिळालेली नाही तर मला २४ तास एक खास सल्लागार मिळाल्याची स्थिती आहे. चोरमुले म्हणाले की, ॲपचा उद्देश शेतकऱ्यांना फोनवर विशेष ज्ञान उपलब्ध करुन देण्याचा आहे. आणि त्यांचे उत्पादन वाढवणे, खर्च कमी करण्यास मदत करणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here