कोरोना वायरस: उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी कोरोना केअर फंडला दिले एक करोड रुपये

लखनऊ (उत्तर प्रदेशच): कोरोना संक्रमणापासून नागरीकांना वाचवण्या दरम्यान देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, संसद फंड आणि आमदार फंडातून कोरोनाशी लढण्यासाठी निधी द्यावा. प्रधानमंत्र्यांच्या पावलावर पाउल टाकत अनेक राज्य सरकारांनीही मुख्यमंत्री कोरोना केअर फंड बनवला आहे. हा फंड बनवल्यानंतर अनेक संसद आणि आमदारांनी आपला पैसा या निधीसाठी दिला आहे. यावेळी ऊस मंत्री सुरेश राणा म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरीकाची ही जबाबदारी आहे की संकटावेळी देशासाठी योगदान देणे. आता संपूर्ण देशाबरोबर उत्तर प्रदेशही कोरोना महामारी शी लढत आहे. अशामध्ये आपल्याला आपल्याकडून सरकारच्या मदतीसाठी हाथ पुढे करायला हवा, जेणेकरुन कोरोनाच्या महामारीला रोकण्यासाठी आजाराशी लढणार्‍या गरजू लोकांची मदत केली जावू शकेल.

ऊस मंत्री राणा म्हणाले की, मी स्वत:च्या विधानमंडळ क्षेत्र विकास निधीकडून मुख्यमंत्री द्वारा सृजित कोरोना केअर फंडासाठी करोड रुपये दिले. पुढच्या कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांनाही पत्र लिहिले आहे, ज्यामुळे लवकरात लवकर पैसे हस्तांतरित होतील. मंत्री म्हणाले की, इतर आमदार, विधान परिषद सदस्य, सांसद आणि पक्षाचे पदाधिकारी यांनीही आपल्या इच्छेनुसार जितकी होईल तितकी मदत फंडासाठी द्यावी. ऊस शेतकर्‍यांना कोरोनाच्या महामारीपासून वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गावात सर्वत्र सोयी सुविधा पोचल्या आहेत. कोरोनाचे संक्रमण गावापर्यंत पोचू नये यासाठी लॉकडाउन केले आहे. सरकार गावातून बाहेर येणार्‍या सर्वांची तपासणी करत आहे. मंत्री राणा म्हणाले, सर्वांनीच कोरोना विरोधात एकजूटीने देशासाठी उभे राहून लढा दिला पाहिजे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here