कर्जमाफीचा फायदा ऊस उत्पादक व फळबाग शेतकर्‍यांना होणार नाही : चंद्रकांतदादा पाटील

लासुर्णे :
महाविकास आघाडीच्या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा ऊस उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकर्‍यांना फायदा होणार नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसेच, शेतकरी प्रत्येक वर्षी पीक कर्ज घेतो. ऊसाच्या बिलातून रक्कम जात असल्याने कर्ज थकीत राहात नसल्यामुळे कर्जमाफी फायदा होणार नाही. त्यामुळे या सरकारची कर्जमाफी योजना फसवी आहे, असेही त्यांनी सांगितले.

लासुर्णे (ता. इंदापूर) येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने युतीला कौल दिला होता. परंतु घटक पक्षाने दगा दिला आहे. देशातील 13 राज्यात भाजपासह समविचारी पक्षाचे सरकार आहे. सध्याच्या सरकारने शेतकर्‍यांचा सातबारा कोरा असणार, असेही सांगितले.

यावेळी भाजपचे अविनाश मोटे, पृथ्वीराज जाचक, बाबासाहेब चवरे, तुकाराम काळे, रामभाउ पाटील, अशोक वणवे, माउली चवरे, नाना शेंडे, शहाजी शिंदे, आकाश कांबळे, अतुल तेरखेडकर, रणजीत पाटील, डॉ. विकास शहा, अजित पाटील आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here