ऊस दरातील वाढ पुरेशी नाही: भरत सिंह वर्मा

बागपत: पश्‍चिम प्रदेश मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगत सिंह वर्मा यांनी बैठक़ीत बोलताना सांगितले की, ऊस दरात केलेली दहा रुपये वाढ पुरेशी नाही. केंद्र सरकारने राज्य सरकारशी चर्चा करुन सर्व राज्यांमद्ये कमीत कमी 600 रुपये क्विंटल दर घोषित करावा. त्यांनी सांगितले की, ऊस पीक देशाचा आणि राज्याचा आर्थिक कणा आहे. एकीकडे साखर कारखान्यांमद्ये ऊसापासून साखर आणि मोलॅसिस बनते, मोलॅसिस पासून अल्कोहोल बनते. अल्कोहोल पासून देशी विदेशी दारू बनते . त्याच बरोबर अल्कोहोल पासून देशामद्ये हजारो उत्पादने तयार होतात. राज्यासह देशातील शेतकर्‍यांबरोबर चुकीच्या नितींमुळे देशाचा अन्नदाता शेतकरी सातत्याने कर्जामुळे आत्महत्या करतो, जे कृषी प्रधान देशातील, दिल्ली मध्ये बसलेल्या नेत्यांसाठी लज्जास्पद आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र चौधरी होते तर सूत्रसंचालन असिम मलिक यांनी केले. यावेळी स. गुरविंदरसिंह, वीरेंद्र सिंह, बिल्लू, योगेंद्र सिंह, नवीन चौधऱी, हाजी सुलेमान, वसीम, भूरा त्यागी, रविंद्र प्रधान, जनेश्‍वर त्यागी, नरेश ऍडव्होकेट आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here