पंजाबमध्ये ऊसाचा दर ३८० रुपये क्विंटल, भगवंत मान सरकारकडून अधिसूचना जारी

चंदीगढ : पंजाबमध्ये भगवंत मान सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. आता त्यांना ३८० रुपये प्रती क्विंटल ऊस दर मिळेल. याबाबत सरकारने शुक्रवारी अधिसूचना जारी केली आहे. कृषी मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी सांगितले की, २०२२-२३ या दरम्यान उसाचा योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) आणि स्टेट ॲग्रीड प्राइस (एसएपी) मधील फरक पंजाब सरकार आणि खासगी कारखान्यांमध्ये  २:१ अशा प्रमाणात निश्चित केले आहे.

अमर उजालामधील वृत्तानुसार, केंद्र सरकारने उसाच्या सर्व वाणांसाठी ३०५ रुपये प्रती क्विंटल दर निश्चित केला आहे. यामध्ये मान सरकारने वाढ करत उच्च गुणवत्तेच्या उसाला ३८० रुपये प्रती क्विंटल तर मध्यम गुणवत्तेच्या उसाचा ३७० रुपये आणि कमी गुणवत्तेच्या उसासाठी ३६५ रुपये दर निश्चित केला आहे. यामधील राज्य सरकारचे ५० रुपये प्रती क्विंटल सर्व ऊस उत्पादकांच्या खात्यावर थेट जमा केले जातील. सर्व कारखाने २० नोव्हेंबरपासून गाळप सुरू करतील. कॅबिनेटची बैठक १८ नोव्हेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत सर्व विभागांना विषय पाठविण्याच सूचना देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here