दाहा : भडल गावातील शेतकऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी मोकाट जनावरांची समस्या आणि थकीत ऊस बिलांचा मुद्दा मांडण्यात आला. भडल गावात शेतकऱ्यांची बैठक झाली. थकीत बिले तातडीने द्यावीत, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी सांगितले की, मोकाट पशूंमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पहारा देण्याची वेळ आली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, बैठकीत पुष्पेंद्र ठेकेदार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मोकाट जनावरांपासून पिक वाचविण्यासाठी दिवस-रात्र पाहारा द्यावा लागत आहे. अनेकवेळा अधिकाऱ्यांना या समस्येवर तोडगा काढण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. मोकाट जनावरांना पकडून गोशालेत भरती करावे अशी मागणी त्यांनी केली. ऊस थकबाकी न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. लवकरात लवकर पैसे देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी धूम सिंह, राजीव राणा, डॉ. सुरेश पाल, सुखपाल, बॉबी, कृष्णपाल, ओमवीर सिंह, सोनू राणा, चांद राणा, कृपाल सिंह, सुनील कुमार, राज सिंह राणा, यामीन आदी उपस्थित होते.