उत्तर प्रदेशमध्ये थकबाकी देण्यासह ऊस दरही वाढणार: योगी आदित्यनाथ

233

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने पाला जाळण्याच्या प्रकरणात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा शेतकऱ्यांना केलेला दंडही माफ केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिली.

यासोबत उसाचे दरही वाढवले जाणार आहेत. शेतकऱ्यांची वीज तोडली जाणार नाही असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. सरकारने पाला जाळण्याबाबत दाखल केलेले शेतकऱ्यांविरोधातील गुन्हे रद्दचा निर्णय घेतला आहे. दंडही परत केला जाईल. राज्यातील शेतकऱ्यांची पै न पै देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. नव्या गाळप हंगामापूर्वी २०१० पासून प्रलंबित पैसे दिले जातील.

विजेच्या थकबाकीच्या कारणावरून एकाही शेतकऱ्याची वीज तोडू नका अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री योगी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ते म्हणाले, कोविड १९ महामारीने आज जगाला वेढले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी धैर्य दाखवले आहे. साखर कारखाने कोविड काळात सुरू राहीले. इतर राजकीय पक्षांनी राजकीय हितासाठी शेतकऱ्यांचा वापर केला. भाजप सरकारने २०१४ पासून पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध काम केले आहे. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काम सुरू केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here