कर्नाटक: FRP पेक्षा जादा दर देण्याच्या घोषणेचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत

म्हैसूर : कर्नाटकमध्ये ऊस खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. कर्नाटक ऊस उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी सांगितले की, सरकारचा हा आदेश म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विजय आहे, ज्यांनी गेल्या ३९ दिवसांपासून अधिक काळ बेमुदत आंदोलनात सहभाग घेतला. शांताकुमार यांनी सांगितले की, सरकारच्या आदेशानुसार साखर कारखान्यांना एफआरपीच्या दरापेक्षा अधिक प्रती टन १०० रुपये आणि जे कारखाने इथेनॉल उत्पादन करतात, त्यांना अतिरिक्त १५० रुपये द्यावे लागतील. ते म्हणाले की, यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २०,००० रुपये उत्पन्न मिळविण्यास मदत मिळेल. २०२२-२३ मध्ये सात कोटी टनाहून अधिक ऊसाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त ९५० कोटी रुपये मिळणार आहेत.

त्यांनी दावा केला की, राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बेमुदत आंदोलनासमोर झुकले आहे. ऊस उत्पादन, तोडणी आणि वाहतूक खर्चापोटी करावा लागणारा अतिरिक्त खर्च भागविण्यासाठी शेतकरी दरवाढ करण्याची मागणी करत होते. त्यांनी या निर्णयाबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे आभार मानले. त्यांनी पुढे सांगितले की, वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता, केंद्र सरकारनेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य एफआरपी (योग्य आणि लाभदायी दर) लागू केला पाहिजे. पत्रकार परिषदेस असोसिएशनचे पदाधिकारी अट्टाहल्ली देवराज, केरी हुंडी राजन्ना, बदनपुरा नागराज आणि लक्ष्मीपुरा व्यंकटेश उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here