आधुनिक पद्धतीने सांगली, कोल्हापूर मध्ये उसाच्या उत्पादनाला मिळाली गती

कोल्हापूर: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये ऊस शेतकर्‍यांना ठिबकसिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळत आहे. गुणवत्ता कायम ठेवून पाण्याचीही बचत होते. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी प्रति एकर 100 टनापेक्षा अधिक ऊस घेत आहेत आणि ते आता प्रति एकर 150-200 टनाच्या ध्येयाकडे जात आहेत.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर चे शेतकरी अशोक खोत, जे सात एकर जमीनीचे मालक आहेत, त्यांनी तीन वर्षापूर्वी 167 टन उसाचे लक्ष्य मिळवले. त्यांनी इनव्हर्टेड ठिबक सिंचन पद्धतीचा यशस्वीपणे प्रयोग केला. ज्याचे पालन आता इतर शेतकरी करत आहेत. खोत यांनी आता प्रति एकर 200 टन ऊसाचे लक्ष्य बनले आहे. अनेक शेतकर्‍यांनी उच्च उत्पादकतेचे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. ते आता परीक्षणाच्या माध्यमातून मातीच्या गुणवत्तेबाबत डेटातून चांगल्या पद्धतीने सुसज्जीत आहे. मला वर्षात दोन वेळा मातीची तपासणी करुन घ्यावी लागते आणि त्याच्या उनसार पोषण मिळते.

विशेषज्ञांच्या मते, ऊसाच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. शेतकर्‍यांनी आता ठिबक सिंचन पद्धती आत्मसात केली आहे आणि उत्पादन वाढवून पाण्याची बचत करत अहेत. खोत यांनी सांगितले की, त्यांनी मॉड्यूलर इनवर्टड ड्रिप इरिगेशन विकसित केले आहे. ज्याबराबेर आता पर्यंत 200 टन प्रति एकराची उच्चतम उत्पन्नाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी गावातील अमर पाटील यांनीही ठिबक सिंचनाचा वापर सुरु केला आहे. त्यांना आता प्रति एकर 130 टन ऊस मिळत आहे. सांगली जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मस्तोली यांनी सांगितले की, पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्टयातील इतर जिल्ह्यातील तुलनेत, सांगली आणि कोल्हापूरमध्ये गेल्या काही वर्षांमद्ये ऊसाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here