यंदा ऊसाचे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन

बिजनौर: जिल्ह्यात यंदाही ऊसाचे चांगले उत्पादन झाले आहे. या उत्पादनाने गेल्यावर्षीचा उच्चांक मोडला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ऊस पिक दहा टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज असताना यंदा शेतांमध्ये उसाचे दमदार उत्पादन झाले. ऊस विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानंतर खोडवा उसाचे उत्पादनही वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात वाढ झाली आहे. जिल्ह्यात सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रात ऊस पिक घेतले जाते. ऊसाचे चांगले उत्पादन आणि साखरेचे उत्पादन वाढल्याने साखरेचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे उसाचा दर वाढण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांना ऊस वगळता इतर पिकांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीत ११ टक्क्यांनी वाढ केल्याचे समोर आले होते.

गेल्या वर्षी गळीत हंगाम दीर्घकाळ सुरू राहील्याने खोडवा उसाला वाढीस फार वेळ मिळाला नसल्याचे दिसते. याशिवाय अवकाळी पावसामुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला. त्यामुळे यंदा ऊसाचे उत्पादन कमी राहील असा अंदाज होता. शेतकऱ्यांनीही उसाचे उत्पादन दहा टक्क्यांनी कमी होऊ शकते असे सांगितले. मात्र, सुरुवातीच्या काळातच शेतांमध्ये चांगले उत्पादन दिसून आले. ऊस विभागाने केलेल्या सर्वेक्षणात गेल्यावर्षीच्या तुलनेत लागण वाढल्याचे दिसून आले. आताही पिकाच्या कापणीनंतर उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी होण्याऐवजी दोन टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात वाढ झाली आहे. ऊसाचे गाळप अद्यापही सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here