‘क्रांती अग्रणी पॅटर्न’मधून एकरी १०० टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन

सांगली : क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या क्रांतिअग्रणी पथदर्शक प्रकल्पातून सुमारे २० हून अधिक शेतकऱ्यांनी एकरी शंभर टनांपेक्षा अधिक उत्पादन घेतले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी १०० शंभर टनांपेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. कारखाना कार्य क्षेत्रात उसाच्या उत्पादन वाढीसाठी पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एकत्रित प्रयत्नातून सरासरी उत्पादन ६० टनांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले.

या प्रोजेक्टमधून जादा उत्पादन मिळविणारे शेतकरी उदय लाड म्हणाले की, कायम उसाचे सरासरी एकरी ७५ ते ८० टन उत्पादन घेतो. क्रांतिअग्रणी कारखान्याच्या ऊसविकास विभागाच्या पायलट योजनेतून एकरी शाश्वत १०० टन या उपक्रमात भाग घेतला. पहिल्याच प्रयत्नात उच्चांकी यश मिळवले. कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्यापैकी विजय जाधव, विद्युलता देशमुख, आत्माराम शिंदे, अशोक पाटील, जयप्रकाश साळुंखे, अरुणा लाड, शांताराम जमदाडे, केरू लाड, हणमंत लाड, अनिल लाड, श्रीमंत लाड, विष्णू पाटील, विशाल लाड, तानाजी लाड, लालासाहेब शिंदे, शिवाजी जाधव, अनिल पाटील, बाळकृष्ण पवार आदी शेतकऱ्यांनी १०० टनांवर उत्पादन घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here