थकबाकीने त्रस्त शेतकऱ्याने शेतातील ऊस पेटवला

 बलरामपूर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

उसाच्या बिलाचे पैसे न मिळाल्याने विजयनगरमध्ये एका शेतकऱ्याने आपल्या शेतात आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुन्नू असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने कारखान्याला दिलेल्या उसाचे बिल तातडीने न मिळाल्याने त्याने ४५०० स्वेअर फुटांतील ऊस जाळून टाकला. तर, उर्वरीत अर्धा एकर ऊस पेटवून देण्याची धमकी दिली आहे. त्याच्या शेताला लागली आग गावकऱ्यांनी विझवली.

मुळात तुलसीपूर येथील बेबीनगर आणि विजयनगर येथे गेल्या दहा दिवसांपासून उसाचे वजन करण्याचे कामच बंद आहे. कारण, इटईमैदा या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे थकवले आहेत. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना केवळ आश्वासन देण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

या संदर्भात चर्चा करण्यासाठी साखर कारखान्यांचे अधिकारी विजयनगरमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना फेब्रवारी महिन्यात थकबाकी देण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी त्यांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पैसे देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

आर्थिक स्थिती बेताची असलेल्या मुन्नू या शेतकऱ्याने २७ हजार स्वेअर फुटांवर उसाची लागवड केली होती. त्यातील काही उसाची तोड झाली असून, तो कारखान्याला जमाही करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या पावतीचे पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत. त्याच्यासाठी शेती हाच एकमेव उदर निर्वाहाचा व्यवसाय आहे. शेतामध्ये ऊस अडकून राहिल्याने गव्हाची पेरणीही थांबली आहे. त्यामुळे जिल्हा ऊस अधिकारी आर. एस. कुशवाह यांचे शेतकऱ्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here