शेतकऱ्यांना देण्यात येणारा ऊस दर आता तीन टप्प्यात

सांगली : सध्याची साखर उद्योगाची स्थिती व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता तीन टप्प्यात एफआरपी देण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात हा पॅटर्न राबवण्यात येणार आहे. त्यावर राळ उठू नये यााठी शेतकर्‍यांकडून संमीतपत्रावर सह्या करुन घेतल्या आहेत. पहिला हप्ता 2400 रुपये, जूनमध्ये मशागतीसाठी 200 रुपये आणि दिवाळीसाठी 200 रुपये असे तीन हप्त्यात उसाचे पैसे देवू, असे कारखानदारांनी सांगितले आहे.

आतापर्यंत दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्याबाबत काही कारखानदारांनी केलेली फसवणूक पाहता शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेजारील जिल्ह्यांपेक्षा आणि कर्नाटक सीमावर्ती भागातील कारखान्यांच्या दरापेक्षा हा हप्ता कमी आहे. राजारामबापू कारखाना, क्रांती कारखाना, सोनहिरा कारखाना, विश्‍वास कारखाना या सार्‍यांनी एकच पॅटर्न राबवला आहे.

शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी 2750 ते 2800 रुपयांची पहिली उचल दिली आहे. त्या तुलनेत सांगली जिल्ह्यात चारशे रुपये कमी दिले जात आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याबाबत अनेकांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते या प्रक्रियेवर नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया दिली ,मात्र त्यांनी तूर्त तरी शांत राहण्याचे ठरवले आहे. शेतकरी चळवळ अडचणीत आणायची, मोडायची असे डावपेच आखले जात असल्याने शेट्टींनी थांबा आणि पहा, अशी भूमिका घेतली आहे.

FRP शंभर टक्के दिली जाईल, याविषयी खात्री बाळगावी, अशी ग्वाही क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिली आहे. तसेच ते म्हणाले कि, सध्याची साखर उद्योगाची स्थिती व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता तीन टप्प्यात एफआरपी देणेच योग्य होईल. शेतकर्यानी याला मान्यता दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आम्ही हा पॅटर्न राबवत अहोत.

ऊस दराचे तीन तुकडे
पहिला हप्ता : 2400 रुपये
दुसरा हप्ता : 200 रुपये
तिसरा हप्ता : 200 रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here