गाळप हंगाम 2023-24 : महाराष्ट्रात 133 साखर कारखाने सुरू

पुणे : साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 2023-24 च्या गाळप हंगामात 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत एकूण 133 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये 63 सहकारी आणि 70 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश असून 61.53 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत ४३.८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सध्या राज्यात साखरेचा सरासरी उतारा 7.12 टक्के आहे. दिवाळी सण झाला आता राज्यातील गाळप हंगामाला गती येईल, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ‘चीनी मंडी’शी बोलताना दिली.

राज्यात गेल्या हंगामात 16 नोव्हेंबर 2022 पर्यंत 174 साखर कारखाने कार्यरत होते आणि त्यांनी 120.4 लाख टन उसाचे गाळप करून 97.25 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे सोलापूर विभागात आतापर्यंत 35 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत सोलापूर विभागात सध्या 15.18 लाख टन उसाचे गाळप करून 10.26 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आणि इथे साखरेची रिकव्हरी 6.76 टक्के आहे.नागपूर विभागात आतापर्यंत एकाही साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू केलेला नाही. अमरावती विभागात केवळ 2 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here