ऊस सचिवांनी केली सितारगंज साखर कारखान्याची पाहणी

रुद्रपूर : ऊस आणि साखर उद्योगाचे सचिव हरवंश सिंह चुघ यांनी सितारगंज साखर कारखान्याची पाहणी केली. कारखान्यातील अधिकाऱ्यांना त्यांनी देखभाल-दुरुस्तीच्या कामात गती आणण्याची सूचना केली. कारखान्याच्या देखभालीचे काम गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत काम समाधानकारक आहे. २० नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दोन्ही बॉयलर कार्यरत आहेत. तर तिसऱ्या बॉयलरची दुरुस्ती सुरू आहे. ऊस सचिव चुघ यांनी आतापर्यंत तीनवेळा कारखान्याची पाहणी केली आहे.

५ डिसेंबर २०१७ रोजी कारखाना बंद करण्यात आला होता. खटीमाचे आमदार पुष्कर सिंह धामी यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर कारखाना सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत मंत्रिमंडळाने निर्देश दिले असून सध्या कंत्राटी पद्धतीने कारखाना सुरू होईल. कारखाना प्रशासन कंपनीला ऊस उपलब्ध करून देईल. त्यासाठी सरकार कंपनीला १.३८ कोटी रुपये दरमहा देणार आहे. कंपनीला दुरुस्तीच्या कामांसाठी १.४५ कोटी रुपये देण्यात आली आहेत. २० नोव्हेंबरनंतर गाळप सुरू करण्याचा प्रयत्न आहे असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कारखान्याचे सरव्यवस्थापक आर. के. सेठ, मनोरथ भट्ट उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here