शेतकऱ्यांसाठी आयोजित ऊस परिसंवादचा समारोप

सोलापूर: महाराष्ट्रात सामाजिक, आर्थिक, सहकार,क्षेत्रात ठळक कामगिरी करणारी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई तर्फे शेतकऱ्यांसाठी ऊस परिसंवादाचे सोलापुरात नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार मदत व पुनर्वसन मंत्री, मा.ना.श्री. सुभाष (बापू) देशमुख होते, तसेच कार्यक्रमाचे विनीत मा श्री विद्याधर अनास्कर, प्रशासकीय सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, व सर व्यवस्थापक सुनिल कदम, व्यवस्थापक जगदीश सनेर, सह.व्यवस्थापक अमोल रणखांबे, अधिकारी कमलाकर मोरे, अधिकारी राहुल उद्रे धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. श्री.अभिजीत पाटील, गोकुळ माउली शुगर चे मा. श्री. साहेबराव पाटील, लोकमंगल शुगर चे संचालक मा. श्री.शहाजी पवार,श्री सिध्देश्वर शुगर्स चे उपाध्यक्ष दीपक आलुरे व कार्यकारी अधिकारी महेश देशमुख आदी उपस्थित होते.

या ऊस परिसंवादाचे स्वागतपर प्रास्ताविक करताना मा. श्री.विद्याधर अनास्कर म्हणाले ” फक्त ठेवी स्वीकारणे आणि कर्ज वाटप करणे इतकेच बँकेचे काम नाही तर ज्या शेतकऱ्यांची हि बँक आहे त्या शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवणं आणि उत्पन्नक्षम बनवणं हे आपले ध्येय आहे.आणि त्यासाठी आंम्ही साखर परिषद तसेच शेतकऱ्यांसाठी ऊस परिसंवाद चे आयोजन करत असतो.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार मदत व पुनर्वसन मंत्री, मा.ना.श्री सुभाष (बापू) देशमुख शेतकऱ्यांना संबोधताना म्हणाले की “ऊस उत्पादकांचे एक चांगले मॉडेल आपण तयार करु, कारण चांगल्या उत्पादकांचे अनुकरण बाकीचे शेतकरी करत असतात त्याचे चांगले मार्केटिंग आपण करू, देशातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र एक मॉडेल बनले पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू.
या ऊस परिसंवादामध्ये कृषीतज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले एकूण पाच सत्रांमध्ये मार्गदर्शन झाले त्यामध्ये
मा.श्री. सुरेशराव काळे – ऊस उत्पादन खर्च व व्यवस्थापन
मा.श्री. संजीव माने – बियाणे व ऊस लागवड
मा.श्री. शहाजी भगत – ऊस पीक व पाणी व्यवस्थापन
मा.श्री. किरण कांबळे – ऊस तोडणी व्यवस्थापन
मा.श्री. पांडुरंग मोहिते – ऊसावरील रोग, कीड व त्यावरील औषधे
यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले.या ऊस परिसंवादाचा समारोप व आभार प्रदर्शन मा.श्री अविनाश महागावकर यांनी केले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here