ऊसाला 500 रुपये दर द्यावा, भाकियूची मागणी

धामपुर: भारतीय किसान यूनियन (अंबावत) ची जिल्हास्तरीय पंचायत धामपूर तहसील येथे झाली. पंचायत मध्ये शेतकऱ्यांनी विविध समस्या बैठकीसमोर ठेवल्या. शेतकऱ्यांनी ऊसाला 500 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणे दर देण्याची मागणी केली. त्यांनी इशारा दिला की, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन केले जाईल.

तहसील परिसरात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी प्रदेश सरकारला शेतकरी विरोधी सांगून घोषणाबाजी केली. आरोप केला की, प्रदेश सरकार शेतकऱ्यांना बर्बाद करण्याच्या मार्गावर आहे. त्यांची जमिन लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाईप्रमाणे सरकार पीकांना योग्य दर देण्यात अपयशी ठरले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आपले पाच सूत्रीय निवेदन उप जिल्हाधिकांना यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, ऊसाचे पैसे व्याजासहित मिळावेत, कृषी अध्यादेश रद्द करावेत, ऊसाला 500 रुपये प्रति क्विंटल दर द्यावा, ऊसाचे पैसे मिळेपर्यंत विज बिलाची वसुली करु नये, पूरग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, आदि मागण्या केल्या आहेत.

यावेळी मलकीत सिंह, शिव कुमार, जसवीर सिंह, निजामुद्दीन, वेदपाल, देवेंद्र त्यागी, आशु पठान, जावेद अख्तर, सुखबीर सिंह, टीकाराम, देवराज, संजीव प्रधान नीरज, तनवीर शाकिर सत्येंद्र आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here