सिधवलिया कारखान्यात ऊसाचे गाळप लवकरच होणार बंद

गोपालगंज : सिधवलीया साखर कारखान्यात लवकरच उसाचे गाळप बंद होणार आहे. कारखान्याने याबाबत सूचनात्मक नोटीस बजावली आहे. गळीत हंगाम २०२२-२३ च्या समाप्तीची ही पहिली नोटीस आहे. कारखान्याला तोडणी पावतीमुक्त केल्यानंतरही क्षमतेनुसार ऊस पुरवठा होत नाही. त्यामुळे गाळप सुरू ठेवल्याने नुकसान सोसावे लागत आहे, असे नोटिशीत म्हटले आहे.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ज्या शेतकऱ्यांकडे बियाण्यासाठीचा वगळता इतर ऊस आहे, त्यांनी आपल्या शेतातील ऊसाचा त्वरीत पुरवठा करावा असे आवाहन कारखाना प्रशासनाने या नोटिशीच्या माध्यमातून केले आहे. ऊस वजन झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरीत बिले देण्यात येतील. नोटिशीनंतरही जर शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला नाही, तर शिल्लक राहणाऱ्या उसाला कारखाना जबाबदार असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ऊस विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आर. के. सिंह यांनी शेतकऱ्यांना लवकर ऊस पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here