मोहिउद्दीनपूर कारखान्याच्या उसाचे किनौनीमध्ये सुरू आहे गाळप

बागपत : मोहिद्दीनपूर साखर कारखान्यातील आगीच्या घटनेनंतर तेथील ऊसाचे गाळप किनौनी साखर कारखान्यात सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चार गावांत किनौनी कारखान्याचे खरेदी केंद्र दोन दिवसांपासून बंद आहे. २६ नोव्हेंबर रोजी शॉर्टसर्किटमुळे मोहिउद्दीनपूर कारखान्यात आग लागली होती. त्यामुळे कारखान्यातील गाळप बंद पडले. तेथील ऊस किनौनी कारखान्यात पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सिरसली, रंछाड, माल माजरा आणि जौहडी गावातील ऊस खरेदी केंद्रांवरील वजन करण्याचे काम बंद पडले आहे. येथील शेतकऱ्यांना आता गव्हाच्या पिकाची पेरणी आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या सतावत आहे.

अमर उजालामधील वृत्तानुसार, सिरसली गावातील राजू तोमर यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून किनौनी साखर कारखान्याचे गावातील वजन केंद्र बंद आहे. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना शंभर रुपये कमी दराने गुऱ्हाळघरांना ऊस पाठवावा लागत आहे. रंछाडचे शेतकरी विनोद तोमर म्हणाले की, ऊसाचे वजन न झाल्यामुळे गव्हाची पेरणी आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात अडचणी येत आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांची लवकरात लवकर सोडवणूक करण्याची गरज आहे. पुरा महादेव गावचे शेतकरी सचिन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा ऊस दुसऱ्या कारखान्याला पाठवला जात आहे. तरीही गेल्या दोन दिवसांपासून अडचणी वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here