पाण्याचा तुटवडा: महाराष्ट्र, कर्नाटकमधील शेतकरी करताहेत ऊस पेरणीस उशीर

पुणे / बेळगाव : लांबलेल्या मान्सूनसह धरणांतील कमी पाणी साठ्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उभ्या ऊस पिकाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईमुळे शेतकरी २०२३-२४ या हंगामासाठी ऊस लागवडीस उशीर करीत आहेत.

द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, श्री रेणुका शुगर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक विरेंद्र सिंह यांनी सांगितले की, पुढील १० दिवस महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस पिकासाठी महत्त्वपूर्ण आहेत. जर तोपर्यंत पाऊस कोसळला नाही, तर या भागातील ऊस पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. पाण्याची पुरेशी उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांकडून ऊस लागवडीस उशीर होताना दिसत आहे.

कोल्हापूरमधील साखरेचे ट्रेडर अभिजित घोरपडे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात उसाची स्थिती गंभीर आहे. ते म्हणाले की, जर पुढील आठवड्यात पाऊस पडला नाही, तर जवळपास १५ टक्के नुकसान होवू शकते. एकदा जर ऊस पिकाचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई होणे कठीण बनते. घोरपडे म्हणाले की, उभे ऊस पिक वाळू लागले आहे. आणि आता शेतकरी त्याचा वापर चाऱ्याच्या रुपात करीत आहेत.

कृषी मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यापर्यंत देशभरात ऊस लागवडीचे एकूण क्षेत्रफळ १६ जूनपर्यंत ४९.८० लाख हेक्टर होते. हे क्षेत्र एक वर्षापूर्वीच्या ४९.३८ लाख हेक्टरच्या तुलनेत एक टक्क्यापेक्षा कमी वाढ दर्शवते. उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मुख्य ऊस उत्पादन क्षेत्रातील धरणांचा जलस्तर गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. कारण, या हंगामात आतापर्यंत कमी पाऊस कोसळला आहे. कोल्हापूर, बेळगाव, सांगली, बागलकोट, सातारा आणि सोलापूर यांसारख्या प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा कमी पाऊस पडल्याचे दिसून आले आहे.

कर्नाटक ऊस उत्पादक संघाचे सचिव अत्तल्ली देवराज यांनी सांगितले की, पुरेशा पाण्याअभावी कर्नाटकमध्ये जवळपास १० ते १५ टक्के क्षेत्रातील ऊस वाळला आहे. कलघटगीमध्ये या वर्षी ऊस लागवडीच्या २५,००० एकर क्षेत्रापैकी जवळपास निम्मा ऊस वाळला आहे. दिवाळीनंतर पाऊस झालेला नाही आणि विंधनविहिरी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ऊस पिक वाळू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here