सहारनपूर : ऊस विभाग आता उत्पादक शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजानुसार शेती करण्यास मार्गदर्शन करणार आहे. त्यातूमुळे साखर कारखान्यांनाही हवमानानुासर उसाचे क्षेत्र तसेच साखर उत्पादनाचे पूर्वानुमान वर्तविणे शक्य होणार आहे. त्यासाठी ऊस विभागाने ऊस विकास परिषदेच्या हवामानाच्या नोंदी सुरक्षित ठेवल्या आहेत. ऊसाचे उत्पादन तसेच साखर उताऱ्यावर हवामानाचा प्रत्यक्ष परिणाम पडल्याने ऊस तसेच साखर उत्पादनात खूप बदल होतो असे विभागाचे म्हणणे आहे.
याबाबत जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उत्पादन, साखर उतारा यावर हवामान बदलाचा प्रत्यक्ष प्रभाव पडतो. प्रतिकूल हवामानाचा उत्पादनावर तसेच साखर उताऱ्यावर तसाच परिमाम होतो. सद्यस्थितीत हवामानाचा कोणताही डेटा विभागाकडे उपलब्ध नाही. मात्र हवामान बदलाने उत्पादनाच्या साखळीतील उतार-चढावांमुळे उत्पादनावर परिणाम होतो. तसेच ऊस उत्पादनाचा अंदाज वर्तविणेही शक्य नसते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून ऊस विकास परिषदेच्या स्तरावर हवामानाची दैनंदिम माहिती संकलित केली जाईल. त्या आधारावर पूर्वानुमान वर्तविणे शक्य होणार आहे.