शामली साखर कारखान्यात पाच शिफ्टमध्ये ऊस पुरवठा

78

शामली : गळीत हंगामादरम्यान शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शामली साखर कारखान्याने पाच शिफ्टमध्ये ऊस वजन करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी व्यवस्था कारखान्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

साखर कारखान्याचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आर. बी. खोखर, ऊस तथा प्रशासन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक कुलदिप पिलानिया, जिल्हा ऊस अधिकारी विजयबहाद्दूर सिंह, शामली ऊस समितीचे सचिव मुकेश राठी यांच्याकडून करण्यात आलेल्या सुविधेअंतर्गत ऊस वजन करण्याची सोय करण्यात आली. मात्र या व्यवस्थेत बैलगाडीतून होणाऱ्या ऊस वाहतुकीला मुक्त ठेवण्यात आले आहे.

रात्री दोन ते सकाळी सहा या वेळेत सात गावांतील शेतकरी सहभागी असतील. तर सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत २७ गावांतील शेतकरी सहभागी असतील. सकाळी दहा ते दुपारी २ वाजेपर्यंत ३८ गावांतील शेतकऱ्यांचा ऊस आणला जाईल. तर दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंतच्या काळात २४ गावे तसेच संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत २६ गावांचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here