ऊसाचा टॉप बोरर किडीपासून बचावाबाबत शामलीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

82

शामली : हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील ऊस संशोधन संस्थेतून आलेल्या संशोधकांच्या पथकाने सहा गावांतील शेतकऱ्यांच्या ऊस शेतीची पाहणी केली. ऊसावर ५० टक्के टॉप बोरर किडीचा फैलाव झाल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणातील कर्नालमधील ऊस संशोधन संस्थेच्या पथकात सहभगी कीटक विशेषज्ञ डॉ. एस. के. पांडे, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. रविंद्र कुमार, जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंग यांच्यासह पथकाने ऊन साखर कारखाना कार्यक्षेत्रातील नाई नंगला येथील शेतकरी अमित कुमार, कमालपूरचे सुमित, बिडौलीचे राजकुमार, केरटूचे माहीराम व ओमपाल, गागोरचे शिवकुमार, सहदेव, रामवीर, पिंडौराचे आशीष, राजेंद्र, विवेक आणि साखर कारखान्याच्या फार्मची पाहणी केली. यावेळी संशोधकांनी उसातील टॉप बोरर किडीला कसा आळा घालावा याची माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, शेतात ५० ते ६० टक्के कीड पसरली आहे. माईट, थ्रीप्स, ब्लॅकचा प्रकोप आहे. अशा स्थितीत ईमिडा क्लोरोपीड ३०० मिली ३०० लिटर पाण्यात मिसळून मिश्रण तयार करावे. ते पिकावर फवारावे. कोराजन, फर्टेरा व फ्युराडॉनचा गरजेनुसार वापर करा. डॉ. रविंद्र कुमार यांनी सांगितले की, ०२३८ प्रजातीवर अधिक फैलाव आहे. शेतकऱ्यांनी १५०२३, १३२३५ व ०११८, १४२०१ या प्रजीचीं लागवड करावी. यावेळी युनिट प्रमुख अवनीश चौधरी, डॉ. विजय माळी, बलराज सिंह, लवप्रीत सिंह आि ऊस विकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here