ऊस वाहतूकदारांचे वाहतूक पोलिसांतर्फे प्रबोधन

दिंडोरी : ऊस वाहतूक करणार्‍या सर्व वाहनांना पाठीमागील बाजूस स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने रिफ्लेक्टर बसविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून सुमारे 50 वाहनांना त्वरीत रिफ्लेक्टर बसविण्यात आले. तसेच पी.ए. सिस्टिमद्वारे कारखाना परिसरात वाहनचालकांना सूचना देण्यात आल्या.

कादवा साखर कारखाना येथे महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत ऊस वाहतुक करणार्‍या वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात आले.

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर यानंतर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. कोणीही वाहतुक नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.
हा सुरक्षा सप्ताह महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावच्या प्रभारी अधिकारी सहा. अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक वर्षा के. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.

याप्रसंगी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हाईस चेअरमन उत्तम भालेराव, माजी संचालक संजय पडोळ, सचिव बाळासाहेब उगले, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावचे पोलीस हवालदार राठोड व पोलीस नाईक योगेश वाध, संदीप भालेराव आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here