उसावर दुहेरी संकट

कोल्हापूर ता 18 : राज्यात ऊस उत्पादनात या वर्षी मोठी वाढ झाली आहे, हे जरी खर असलं तरीही यावर्षी पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात झालेले अतिवृष्टीमुळे गारठून गेलेला ऊस आणि आता पावसानंतर पाण्याअभावी करपून निघालेल्या उसामुळे यावर्षीचे ही ऊस उत्पादन सरासरी एवढेच राहील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या पाहणीमध्ये पाण्यामुळे बहुतांशी ऊस क्षेत्र बाधित होणार असल्याचे नमूद केले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊस उत्पादन सरासरीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, किंबहुना तशी उसाच्या जादा क्षेत्राची नोंदही झालेली आहे. दरम्यान पावसाने आपला कार्यकाल वाढवला. सतत महिनाभर झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या ऊस पिकास इतर पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला, याची पाहणी करण्यासाठी महसूल प्रशासनाने तहसीलदार कार्यालयाला आदेश दिले होते. त्या आदेशानुसार प्राथमिक चौकशी अहवालात उसासह इतर पिकांना फटका बसल्याचे नमूद केले आहे. सर्वाधिक पाउस झाल्यामुळे आणि आता पडणाऱ्या खडक उन्हामुळे पाण्याअभावी ऊस पिकाला मार बसत आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या ऊस पिकास सह इतर पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here