ऊस उत्पादन वाढवणारा हा वाण

एकीकडे ऊस थकबाकीच्या समस्येवर ऊस शेतकरी संघर्ष करीत आहेत तर दुसरीकडे ऊस उत्पादन नसल्यामुळे ते असंतुष्ट आहेत. आता ते गेल्या वर्षी VSI ने प्रसारित केलेल्या उसाच्या नवीन वाणाने आपले ऊस उत्पादन व उत्पन्न वाढवू शकतात.

वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट च्या शास्त्रज्ञांनी VSI १२१२१ या नवीन वाणाची निर्मती मागच्या वर्षी केली होती. ऊस आणि साखर उत्पादन त्यासोबतच साखर उतारा वाढीसाठी साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत या वाणाला मान्यता देण्यात आली होती. VSI १२१२१ हा वाण जलद वाढणारा असून ‘को ८६०३२’ पेक्षा जास्ती साखर व ऊस उत्पादन देणारा आहे. हा वाण १३ – १४ महिन्यात पक्क्व होणार असून खोडवा पिकाचे चांगले उत्पादन, उसाला तुरा न येणारा, फुटवे व पक्क्व उसाची संख्या जास्ती असणारी, पानांवरती कूस नसलेली आणि चोथऱ्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे वाणा मध्ये कडकपणा दिसून येतो. कानी, तांबेरा, ऊस लाल रंगाचा होणाऱ्या रोगास माध्यम प्रतिकारक्षम असलेने, आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरु या तिन्ही हंगामात या वाणाची लागवड करता येते.

VSI १२१२१ ची वैशिष्ठे – 

१) को ८६०३२ च्या तुलनेत १८.८५ टक्के जास्ती ऊस उत्पादन क्षमता
२) गूळ उत्पादनासाठी हा वाण अधिक फायदेशीर
३) सरासरी प्रति हेक्टरी १४१.२४ टन उत्पादन
४) उसाच्या रसातील साखरेचे प्रमाण को ८६०३२ च्या तुलनेत ४.२४ टक्के इतके जास्ती
५) पानांवरती कूस नसलेने जनावऱ्यांच्या चाऱ्यासाठी चांगला वापर होऊ शकतो
६) खोडवा ऊस उत्पादकता सरासरी प्रति हेक्टरी १२१.१२ टन
७) को ८६०३२ च्या तुलनेत साखर उत्पादन २१.५ टक्के आणि खोडवा उत्पादन १५.४२ टक्के अधिक

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here