मागण्या मान्य न केल्यास उसाची तोडणी रोखणार : भारतीय किसान युनियन (चारुनी)

कर्नाल : कर्नाल धान्य मंडईत भारतीय किसान युनियनच्या (चारुनी) बॅनरखाली आयोजित करण्यात आलेल्या महापंचायतीमध्ये ऊसाचे राज्य समर्थन मूल्य (एसएपी) सध्याच्या ३६२ रुपये प्रती क्विंटलवरुन वाढवून ४५० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. राज्य सराकरने एसएपी निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीसोबत १६ जानेवारी रोजी बैठकीत या मागण्या मान्य झाल्या नाहीतर तर १७ जानेवारीपासून ऊसाची तोडणी बंद करणे आणि साखर कारखान्यांना ऊस न पाठविण्याचे आंदोलन केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली.

यावेळी त्यांनी २० जानेवारीपासून बेमुदत राज्यातील सर्व साखर कारखाने बंद करण्याचीही घोषणा केली. राज्य सरकारने ऊसाच्या दराबाबत १५ दिवसांत अहवाल देण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ १६ जानेवारी रोजी पंचकुला येथे समितीची भेट घेईल. उपायुक्त अनीश यादव आणि पोलीस अधीक्षक गंगा राम पुनिया यांच्यासोबत झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस बिकेयूचे अध्यक्ष गुरनाम सिंह चारुनी आणि इतर शेतकरी नेते सहभागी होते. एक तास ही बैठक सुरू राहिली. त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्या समिती सदस्यांसमोर उपस्थित करून बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

चारुनी यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, खर्चात सतत वाढ होत आहे आणि आमचे उत्पन्न कमी होत आहे.

ते म्हणाले की, आम्ही समितीच्या सदस्यांची भेट घेऊ आणि आमच्या मागण्या मांडू. आम्ही वाट्टेल तो त्याग करण्यास तयार आहोत. जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही आमची पिकेही जाळून टाकू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here