ऊसतोड कामगारांची आता ॲपवर नोंदणी

68

पुणे : महाराष्ट्रातील ऊस तोडणी कामगारांच्या नोंदणीसाठी राज्य सरकारने वेबसाईट आणि मोबाईल ॲपची निर्मिती केली जात आहे. या कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती ऑनलाइन नोंदवली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. मात्र यासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी एकत्रीत नाही. सप्टेंबर महिन्यात सरकारने ही नोंदणी करून ऑफलाइन ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता याची प्रक्रिया राबवून ऊसतोड कामगारांना ओळखपत्रे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

याअंतर्गत ऊस तोडणी कामगारांची माहिती एकत्रित करण्यासाठी अद्ययावत वेबसाईट, मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करण्यात येत आहे. यासंबंधीचा निर्णय नुकताच सरकारने जाहीर केला आहे. वेबसाईट आणि ॲपचे काम महाराष्ट्र राज्य माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाकडे (महाआयटी) देण्यात आले आहे. महाआयटीला या प्रकल्पासाठी सुमारे २८ लाख रुपये खर्च येणार आहे. हा निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. अ‍ॅप आणि वेबसाईट मराठीसह इंग्रजी भाषेत असेल. याचे सिक्युरिटी ऑडिट करणे, वेबसाईट आणि अ‍ॅपचे मालकी हक्क सामाजिक न्याय विभागाकडे असतील. याबाबत सरकारने आदेश जारी केला आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here