शासनाचा आदेश मिळताच, ऊसतोड कामगारांची गावी जाण्याची तयारी पूर्ण: साखर सहसंचालक अरुण काकडे

कोल्हापूर, ता. 16: कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांच्या सोळा हजार कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यासाठी तयारी केली आहे. पंधरा दिवसापूर्वीच ही तयारी झाली आहे. सरकारकडून सूचना आल्यानंतर तात्काळ त्यांना सुखरुप पाठविण्याची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी दिली.

अरुण काकडे म्हणाले, जिल्ह्यातील गुरुदत्त, जवाहर, शरद, बिद्री, दत्त (शिरोळ) पंचगंगा व दालमिया या साखर कारखान्यांचे कर्मचारी आपल्या गावी जाण्यासाठी तयार आहेत. 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल होवून या कामगारांना आपल्या जिल्ह्यात जात येईल, असे चित्र होते. दरम्यान केंद्र सरकारकडून अशा सूचना अद्याप आलेल्या नाहीत. तरीही, सर्व कामगारांनी आपले सर्व साहित्य बांधून तयार ठेवले आहे. केंद्र सरकारकडून आदेश येताच त्याच दिवशी हे सर्व कामगार आपआपल्या गावाकडे सुखरुप पोचले जातील, याची काळजी कारखान्यांसह साखर सहसंचालक कार्यालयानेही घेतली आहे. यातून ही त्यांना येथेच थांबावे लागले तरीही त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदार ज्या-त्या कारखान्यांनी घेतली असल्याचे श्री काकडे यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here