कामगारांच प्रश्‍न निकालात काढा 

अन्यथा कारखाने सुरू होवू देणार नाही : ऊस तोड मंजूरांचा मोर्चा 
कोल्हापूर, दि. 2 : ऊस तोडणी मजूरांच्या मजुरी वाढ, वाहतूक दरात वाढ करावी यासाठी त्रिपक्षीय करार करावा अशी वारंवार मागणी केली जात आहे. तरीही, शासन त्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे हा त्रिपक्षीय करार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांने सुरू करू देणार नाही, असा इशारा ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांनी आज दिला. ऊस तोडणी मजूरांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर आज मोर्चा काढला. दसरा चौकातून निघालेला मोर्चा दुपारी एक वाजता सहसंचालक कार्यालयावर धडकला. ऊस तोड मजूरांच्या विविध मागण्यांच निवेदन प्रभारी प्रादेशिक उपसंचालक डी. एस. खांडेकर यांना दिले.
निवदेनात म्हटले आहे की, महागाई वाढत आहे. त्यातुलनेत मंजूरांना मिळणारी मजुरी मिळत नाहीत. शासनाकडे वारंवार याबाबत मागणी केली आहे. तरीही शासनयाकडे लक्ष देत नाही. प्रत्येक हंगामात वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. आता या कामगारांच्या मागणी मान्य न झाल्यास यावर्षीचा हंगाम सुरू होवू देणार नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी महाराष्टल ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, ऊस तोडणी व वाहतूकदारांच्या दरात वाढ करावी अशी मागणी वर्षभर केली जात आहे. ऊस तोडणी यंत्राला टनाला चारशे रुपये दिले जातात. मजूराला मात्र 228 रुपये दिले जातात हा मजूरांवर अन्याय केला जात आहे. याबाबत सप्टेंबरला राज्य साखर संघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली, ते सकारात्मक आहेत. पुढच्या बैठकीची वाट न पाहता मजुरीत वाढ केली पाहिजे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ऊस वाहतूक परवडत नाही. त्यासाठी पेट्रोल दरवाढीच्या तुलनेत किमान 50 टक्के वाहतूक दरात वाढ करावी. स्थानिक सुमारे चाळीस हजार, तर परजिल्ह्यातील सुमारे साठ हजार, असे एक लाख ऊस तोडणी मजूर जिल्ह्यात येत असतात. याचा विचार शासनाने केला पाहिजे. यावेळी प्रा. आबासाहेब चौगले, आनंदा डाफळे, दिनकर आदमापुरे, बाबासो कुरुंदवाडे, विलास दिंडे आदी उपस्थित होते.
SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here