ऊस कार्यशाळेत शेतकऱ्यांना प्रगत तंत्राबद्दल मार्गदर्शन

मुजफ्फरनगर : खतौली येथे शुक्रवारी साखर कारखान्याच्या यार्डमध्ये आयोजित ऊस कार्यशाळेत तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना प्रगत शेतीबाबत धडे दिले. वेळेवर पिकाची देखभाल आणि निरोगी बियाण्यांचा वापर केल्या शेतीसह पिकामध्ये सुधारणा होते असा सल्ला यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांना सिंचनाबाबतही मार्गदर्शन करण्यात आला.

कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी कार्यशाळेतील मार्गदर्शन सत्रास प्रारंभ केला. महा व्यवस्थापक कुलदिप राठी यांनी नव्या प्रजातीच्या उसाबाबत माहिती दिली. ऊसाची लावण करताना दोन सऱ्यांमध्ये चार फुटांचे अंतर ठेवावे असे त्यांनी सांगितले. उप महाव्यवस्थापक ए. के. सिंह यांनी मातीमधील कार्बनची कमतरता पूर्ण करण्यासाठी शेणखत आणि प्रेसमडचा वापर करावा याबाबत माहिती दिली. शेतात ट्रायकोडर्माचा वापर नियमीत करावा असे ते म्हणाले. चांगल्या प्रतीचे बियाणे वापरल्यास शेती समृद्ध होते असे ते म्हणाले. ऊस संशोधन केंद्रे, नर्सरीतून नव्या प्रजातीची रोपे वापरण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. खतौली साखर कारखान्यात एसटीडी तसेच एचएमटी प्लांट उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. सी. के. दीक्षित यांनी नव तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. कोविड १९चा प्रसार रोखण्यासाठी सॅनिटायझर, मास्क वापराबाबत त्यांनी आवाहन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here