उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखाने चालू ठेवणार गाळप

लखनऊ(उत्तरप्रदेश) : कोरोना संक्रमणापासून बचावासाठी जाहीर करण्यात आलेल्या 21 दिवसांच्या लॉक डाउन मध्येही उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांचे गाळप सुरु राहील. प्रदेश सरकारने ऊस आणि साखर या दोन्ही ला अत्यावश्यक वस्तू असल्याचे सांगून हा निर्णय घेतला आहे. पण साखर, इथेनॉल आणि हैण्ड सॅनिटायजर  बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल  चूना, ग्लिसरीन व  पॉली प्रॉपलीन (पीपी) यांचा पुरवठा महाराष्ट्र , राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम बंगाल येथून येतो.

लॉकडाउनमुळे या वस्तूंचा पुरवठा झाला नाही तर प्रदेशातील साखर कारखान्यांना गाळप थांबवावे लागेल आणि कारखाना सक्तीने बंद करावा लागेल. या परिस्थीला तोंड देण्यासाठी प्रदेशाचे मुख्य सचिव यांनी या राज्यातील मुख्य सचिवांना पत्र लिहिली आहेत. या पत्रात साखर कारखाने सुरु ठेवण्यासाठी त्यांना चूना, ग्लिसरीन आणि पॉली प्रापलीन यांचा पुरवठा करण्यात यावा, असे नमूद केले आहे.

मुख्य सचिवांनी पत्रात आवश्यक वस्तूंसाठी बनवलेल्या नियम आणि कायद्याचाही उल्लेख केला आहे. साखर कारखान्यात या दिवसात गाळपाने वेग घेतला आहे, अशाा मध्ये कारखाना गेट आणि आसपास शेतकरी तसेच कारखाना कर्मचाऱ्यांची येजा सुरु असते. यांच्यामध्ये संंक्रमण पसरू नये यासाठी योग्य काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. प्रदेशाचे ऊस विकास आणि साखर उद्योगमंत्री सुरेश राणा यांनी केलेल्या चर्चेत सांगितले की, त्यांच्या विभागाकडून सर्व साखर कारखान्यांसाठी एडवाइजरी जारी केली आहे.

ऊस घेउन येणाऱ्या वाहनावर केवळ एकच शेतकरी असेल. सर्व वाहन योग्य अंतरावर उभे राहून वजनासाठी आपल्या वेळेची प्रतिक्षा करतील. कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांना साबणाणे हात धुवावे लागतील. कारखान्याच्या आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्या जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने आहेत तिथे प्रशासनानेही देखरेख करण्याची सूचना दिली आहे. प्रदेशात आता जवळपास 25 टक्के ऊस शेतात उभा आहे. महाराष्ट्रात ऊसाची समुचित उत्पादन न होण्यामुळे या वेळी देेशाची घरगुती मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी यूपी वर आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here