साखर कारखान्यांना ३१ ऑक्टोबरपूर्वी बिले देण्याचे निर्देश

शामली : जिल्हाधिकारी जसजित कौर यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देण्यास उशीर केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी शामली, ऊन, थानाभवन साखर कारखान्याच्या प्रशासनाला ऑक्टोबरअखेरपर्यंत सर्व पैसे देण्याचे निर्देश दिले.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कारखान्यांनी उसाचे सर्व पैसे देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. सप्टेंबर महिन्यात अपुर्ण राहीलेले पैसे, थकबाकी ३१ ऑक्टोबरपर्यंत दिले गेले पाहिजेत. साखर कारखान्यांकडून थानाभवनला २५ ऑक्टोबर, शामली कारखान्याला २८ ऑक्टोबर आणि ऊन कारखान्याला ३० ऑक्टोबरपर्यंत गाळप हंगाम सुरू केला जाईल असे आश्वासन देण्यात आले. थकीत बिलांच्या प्रश्नाबाबत झालेल्या आढावा बैठकीस अर्थ विभागाचे एडीएम अरविंद कुमार सिंह, शामली कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक कुलदीप पिलानिया, ऊन कारखान्याचे ऊस महा व्यवस्थापक अनिल अहलावत, थानाभवन कारखान्याचे जितेंद्र सिंह, शामली कारखान्याचे ऊस निरीक्षक प्रेमनारायण शुक्ला, शामली ऊस सहकारी समितीचे विशेष सचिव मुकेश राठी आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा</span
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here