पीएम किसान सन्मान निधी व इतर योजनांतून शेतकऱ्यांना पाठबळ: पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान योजना आणि कृषी क्षेत्राशी निगडीत इतर योजनां आपल्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना नवी ताकद देत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शेतकरी जर मजबूत झाले तर देश समृद्ध होईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

याबाबत न्यूज २४ ऑनलाइनवर प्रकाशित वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले आहे की, देशाला शेतकऱ्यांच्या कामगिरीवर गर्व आहे. ते जितके मजबूत होतील, तेवढा भारत समृद्ध होईल. मला आनंद वाटतो की पीएम किसान योजना आणि कृषी क्षेत्राशी निगडीत इतर योजना कोट्यवधी शेतकऱ्यांना नवीन ताकद देत आहेत. यावेळी पंतप्रधानांनी किसान सन्मान निधी व इतर योजनांची माहितीही दिली.

या कार्यक्रमात ११.३ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट १.८२ लाख कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची वार्षिक मदत आणि कोरोना महामारीच्या काळात १३० लाख कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. जे छोट्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरले आहे. कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी ११६३२ योजनांसाठी ८५८५ कोटी रुपयांच्या कर्जाला मंजूरी देण्यात आली. सर्व बाजार समित्यांना डिजिटल रुपात परिवर्तीत करण्यात आले असून यामध्ये १.७३ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करून १८७ लाख कोटी रुपयांचा व्यापार ई एनएएमच्या माध्यमातून झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here