ऊसावरील किडींच्या नियंत्रणासाठी अधिकारी, संशोधकांकडून सर्वेक्षण

शाहजहांपूर : अधिकारी आणि ऊस संशोशन परिषदेच्या संशोधकांच्या समितीने निगोही साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांची पाहणी केली. पथकाने यावेळी शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना किड, रोगांवरील संरक्षणाबाबत उपाय सांगितले. राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांच्या निर्देशानंतर या समितीची स्थापना करण्यात आली आहे. ऊसाचा कॅन्सर म्हटल्या जाणाऱ्या लाल सड रोग आणि टॉप बोरर रोगाबाबत उपाय योजना आणि जनजागृती करण्यासाठी जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम भार्गव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार समितीमध्ये ऊस संशोधन परिषदेचे वैज्ञानक डॉ. सुजीत प्रताप सिंह व डॉ. एस. पी. सिंह, निगोही साखर कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक आशीष त्रिपाठी, निगोही ऊस विकास परिषेदेचे विकास निरीक्षक सर्वेश कुमार आणि संजय तिवारी आदींचा समावेश आहे. यावेळी निगोही साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील तेरा, कटिया बुजुर्ग, मूडा फत्तेपुर, सतवा, रोशननगर, दौलतपुर, काजीपुर, डेलखेड़ा, बिलंदपुर, परसरा परसरी, ढकिया तिवारी आदी गावातील शेतांचे सर्वेक्षण करण्यात आले. शेतकऱ्यांना या किड, रोगांपासून पिक कसे वाचवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here