स्वाभिमानी महिला आघाडीतर्फे मंत्री हसन मुश्रीफ यांना खर्डा भाकरी देऊन ओवाळणी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील वर्षीच्या उसाला दुसऱ्या हफ्ता ४०० रुपये आणि यंदाच्या गळीत हंगामातील ३ हजार ५०० रुपये द्यावा, या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश आणि अन्य शेतकरी संघटना यांनी आंदोलन सुरु केल्याने जिल्ह्यातील गाळप हंगाम अत्यंत संथगतीने सुरू आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील स्वाभिमानी महिला आघाडीतर्फे दिपावली भाऊबीजनिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खर्डा भाकरी देऊन ओवाळणी करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना लवकरात लवकर ऊस दराचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. मागील हंगामातील उसासाठी ४०० रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटना मागत आहे, पण कारखानदारांना ही मागणी मान्य नाही. आंदोलनाला बसलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना चर्चेची दारे खुली असल्याचे सांगितले आहे. परंतु कारखानदार अद्याप या मागण्याबाबत सकारात्मक नाहीत. आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी कॉंग्रेसचे नेते, आमदार सतेज पाटील आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते, आमदार विनय कोरे हे शेट्टी यांच्याशी साखर कारखानदारांमार्फत वाटाघाटी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here