स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २१ वी ऊस परिषद १५ ऑक्टोबरला होणार

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (SSS) राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी २१ व्या ऊस परिषदेची घोषणा केली. ते म्हणाले की, शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर १५ ऑक्टोबर रोजी २१ वी ऊस परिषद होईल. शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले की, २१ वी ऊस परिषद जयसिंगपूर शहरात आयोजित केली जाईल. आगामी गळीत हंगामात प्रती टन एफआरपीची (योग्य आणि लाभदायी मूल्य) पहिली उचल आधीच निश्चित करावी, या मागणीसाठी याचे आयोजन केले आहे. तर २४ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर आणि शेजारील सांगली जिल्ह्यात जनजागृतीसाठी जागर यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेदरम्यान, शेट्टी हे एफआरपीबद्दल तसेच ऊस दरासाठीच्या लढाईबाबतची जनजागृती करणार आहेत.

शेट्टी यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, तिचे तीन तुकडे केले जावू नयेत अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटना करणार आहे. ही पद्धत तत्कालीन महाविकास आघाडी (एमएव्ही) सरकारने ठरवली होती. मात्र, शेतकरी यास नकार देवून आपला विरोध नोंदवतील. शेट्टी यांनी सांगितले की, मी आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे केलेले तीन तुकडे रद्द करण्याची मागणी केली आहे. यावेळी डॉ. जालंदर पाटील, एसएसएसचे प्रदेशाध्यक्ष सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, वैभव कांबळे यांच्यासह एसएसएसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here