स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाच्या बिला ऐवजी मागितली हि वस्तू

पुणे : चीनी मंडी

ऊस उत्पादकांच्या एक रकमी एफआरपीसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस बिलाच्या बदल्यात साखर देण्याची नवी मागणी केली आहे. कृषी मुल्य आयोगाने निश्चित केलेल्या २ हजार ९०० रुपये दराने साखर ऊस उत्पादकांना द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मुद्द्यावर येत्या २८ जानेवारीपासून हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला असून, त्यादिवशी पुण्यातील साखर संकुलावर मोर्चा काढणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.

शेतकरी ऊसबिलापोटी साखर घेण्यास तयार असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शिल्लक देय रकमेइतकी साखर द्यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. राज्य सरकारने याबाबत त्वरीत पत्रक काढावे, अशी मागणी स्वाभिमानीचे वकील अॅड. योगेश पांडे यांनी केली आहे. यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले तरी, राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस बिलाची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत.

साखर नियंत्रण कायद्यानुसार कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उसाचे बिल जमा करणे कारखान्यांना बंधनकारक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. राज्य सरकारही यावर कोणतिही भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त

शेखर गायकवाड यांना निवेदन देऊन, एफआरपीप्रश्न कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत आयुक्त गायकवाड यांनी शिल्लक एफआरपीवर शेतकऱ्यांना १५ टक्के व्याज देण्याची नोटिस कारखान्यांना बजावली आहे.

जीएसटी’चा प्रश्नच नाही

शेतकरी ऊस देऊन साखर खरेदी करत असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचा कर किंवा ‘जीएसटी’ लागू होत नाही, असे मत खासदार शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. उसाच्या बदल्यात साखर घेत असल्याने कोठेही आर्थिक व्यवहार होत नसल्याचे खासदार शेट्टी यांचे मत आहे.

 

डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here