बिद्री कारखान्याची निवडणूक ‘स्वाभिमानी’ स्वबळावर लढणार : अजित पोवार

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना बिद्री साखर कारखान्याची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाच्या सोबत जाऊन विश्वासघात करून घेणार नाही, असे प्रतिपादन संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी केले. तिटवे येथे स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पोवार म्हणाले की, गेल्या निवडणुकीत के. पी. पाटील हे भाजपसोबत गेले. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बाजूला केले. यंदा तसे होऊ देणार नाही. ‘बिद्री’चे रणांगण स्वबळावर जिंकू. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या निर्धाराला हात उंचावून पाठिंबा दिला.

संघटनेचे राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात संघटनेचे राष्ट्रीय नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ५२८ किलोमीटरची पदयात्रा नियोजन करण्यात आले. विजय यादव, बंडोपंत पाटील, संतोष बुटाले, बाळासाहेब पाटील, आनंदा पाटील, संजय देसाई, पांडुरंग जरग, सी. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंडित किल्लेदार, एकनाथ येरुडकर, भागोजी कांबळे, सदाशिव चौगले, कुंडलिक पाडळकर, आनंदा घारे, प्रकाश जाधव कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here