स्वराज इंडियाचे सॅनिटायजर लवकरच विक्रीसाठी बाजारात

स्वराज इंडिया एग्रो लिमिटेड संचलित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना यांचे हॅन्ड सॅनिटाईजर च्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात करण्यात आली. या वेळी कु. ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि स्वराज कंपनीचे सरव्यवस्थापक श्री. शेख जीलानी सो कारखान्याचे चिफ इंजिनिअर श्री. प्रफुल्ल चव्हाण साहेब, डीस्टीलरी मॅनेजर श्री. नंदकुमार पाटील सो, रोहित नागटिळे सो, सौ. उषा घाडगे मॅडम, सौ. अपर्णा मॅडम व एच आर विभाग प्रमुख दादा जगदाळे आणि इतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

जनसामान्यांच्या हिताचे व जगामध्ये निर्माण झालेल्या कोरोना सारख्या घातक विषाणुंपासुन सुरक्षीत राहण्यासाठी स्वराज एग्रो ने आपल्या डीस्टीलरीतुन अतिशय सुसज्य पद्धतीने हॅन्ड सॅनिटायझर उत्पादन सुरू केले, लवकरच हे प्रोडक्ट मार्केटमध्ये अगदी सहजपणे व माफक दरामध्ये उपलब्ध होईल .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here