स्वराज साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदिपन उत्साहात

96

सातारा : जिल्ह्यात साखर कारखान्यांच्यावतीने आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपवळे येथील स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेड संचालित लोकनेते हिंदूराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याचा आठव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ उत्साहात झाला.

स्वराज्य ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचलित लोकनेते हिंदूराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन माढा मतदारसंघाचे खासदार, रणजितसिंह हिंदूराव नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या, अॅड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह साखर कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी देखभाल, दुरुस्तीची कामे पूर्ण करुन सरकारच्या निर्णयानुसार हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी जय्यत तयारी चालवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here