गेल्या काही काळापासून विविध कारणांनी शुगर स्टॉक्सची गोडी वाढल्याचे दिसून आले आहे. श्री रेणुका शुगर्सच्या शेअर्सच्या दरातही जोरदार वाढ पाहायला मिळत आहे.
श्री रेणुका शुगर्सचे शेअर गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रेणुका शुगरच्या शेअरची किंमत आज २.५० रुपये प्रती शेअर अपडाइड ओपन झाली. इंट्राडेमध्ये हा शेअर ४९.५० पुपये या आपल्या अप्पर सर्किटच्या अगदी दवळ ४९.१५ रुपये प्रती शेअरपर्यंत पोहोचला. गेल्या दोन दिवसांपासून शेअरमध्ये जबरदस्त वाढ दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात शेअरने चांगला रिटर्न दिला आहे.
रेणुका शुगर्सच्या शेअरमध्ये तेजी येण्यामागे भविष्यात अदानी समुहाकडून या कंपनीची खरेदी केली जाण्याची शक्यता असल्यामुळे आहे. मात्र बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, श्री रेणुका शुगर्सने शेअरच्या किमती वाढीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
द्वारिकेश शुगर्स, दालमिया भारत अँड इंजस्ट्रिज, मवाना शुगर्स, राणा शुगर्स आणि मगध शुगर्स अँड एनर्जी या प्रमुख शेअर्सनी गेल्या काही दिवसांत चांगली कामगिरी केली आहे.
इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम, साखर निर्यात आणि साखर उद्योगाची चांगली कामगिरी ये शुगर स्टॉक्समधील तेजीचे कारण आहे.