सांगलीच्या पटवर्धनांना स्विस कर विभागाची नोटीस

141

नवी दिल्ली : सांगलीचे संस्थानिक असणार्‍या पटवर्धन परिवाराचे वारसदार विजयसिंह पटवर्धन व त्यांची पत्नी रोहिणी पटवर्धन यांच्या नावे स्वित्झर्लंडच्या कर विभागाने नोटीस बजावली आहे. भारतीयांनी स्विस बँकेत दडवलेल्या काळ्या पैशांची माहिती जाणून घेण्याच्या चौकशीतून सांगली येथील पटवर्धन परिवाराचे नाव उघड झाले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिचे ते आईवडील आहेत.

या प्रकरणी विजयसिंह पटवर्धन व रोहिणी पटवर्धन यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. तसेच, त्यांच्या कंपनीच्या अधिकृत इमेल आयडीवर पाठवण्यात आलेल्या प्रश्‍नांनाही त्यांनी उत्तर दिले नाही. स्विस कर विभागाच्या नियमानुसार अशी माहिती देण्यापूर्वी संबंधित खातेदारास आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाते. त्यानुसार स्विस कर विभागाने पटवर्धन दाम्पत्याशी एका सार्वजनिक सूचनेद्वारे संपर्क साधला असून या प्रकरणी प्रतिनिधी नेमावा, असे निर्देश दिले आहेत. स्विस बँकेने बजावलेल्या या नोटिशीनंतरच पटवर्धन परिवाराची नावे उघड झाली. स्विस सरकारने आपल्या विभागीय राजपत्रात (गॅझेट) 19 नोव्हेंबरला ही सूचना प्रसिद्ध केली असून या दोघांना 10 दिवसांत प्रतिनिधी नेमण्यास सांगितले आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here