सीरिया: साखर उद्योगाच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव

390

दमास्कस : सीरियात गेल्या काही वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेल्या साखर उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी योजना तयार करण्यात आली आहे. याबाबत सीरियाचे उद्योग मंत्री जियाद सब्बाग यांनी सांगितले की, मस्काना आणि अल रक्का शुगर कंपनीचे पुनरुज्जीवन करणे आणि गुंतवणुकीसाठी गुंतवूकदारांशी करार करण्यात आला आहे. देशातील युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत उद्योग मंत्रालयाचे सुमारे एक ट्रिलियन सीरियाई पाउंडचे नुकसान झाले आहे.

मंत्री जियाद सब्बाग यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रात १०३ सुविधा आहेत. त्यामध्ये ५४ वाहतुकीच्या आणि ४९ विना वाहतूक सुविधांचा समावेश आहे. यातील १८ ठिकाणे नष्ट झाले आहेत. आम्ही इराणसोबत चर्चा केली आहे. तेथे गुंतवणुकीच्या योजनंवर चर्चा करण्यासाठी एका कराराच्या टप्प्यावर आलो आहोत. यासोबतच सब्बाग यांनी सांगितले की, आतापर्यंत उद्योग मंत्रालयाकडे गुंतवणुकीसाठी संयुक्त अरब अमिरातकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. एक्स्पो २०२० मध्ये योजनांची मांडणी करण्यात आली होती. आम्हाला अपेक्षा आहे की, यूएई पुर्ननिर्माण प्रक्रियेत सहभागी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here