नवी दिल्ली : तालीबानने अफगाणीस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर देशात भारताकडून केल्या जाणाऱ्या साखर निर्यातीवर परिणाम झाला आहे. अफगाणीस्तानला होणारी साखर निर्यात जवळपास थांबली आहे. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ताधारी सरकार बेदखल केले आहे. गेल्या महिन्यात काबुलवर कब्जा केल्यानंतर तालीबानने देशाचे नियंत्रण आपल्या हाती घेतले आहे.
भारताकडून अफगाणीस्तानला सुमारे ६ ते ७ लाख टन साखर निर्यात केली जाते. उपलब्ध आकडेवारीनुसार या महिन्यात समाप्त होणाऱ्या २०२०-२१ या हंगामात आतापर्यंत ६,५०,००० टन साखर निर्यात करण्यात आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, खाद्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुबोध कुमार सिंह यांनी सांगितले की, अफगाणीस्तानला आमच्या साखर निर्यातीला फटका बसला आहे. अफगाणीस्तानची साखर निर्यात पुढील हंगामात पुन्हा सुरू होण्याची गरज आहे. तोपर्यंत नव्या सरकारची व्यवस्था सुरळीत होईल.
दरम्यान, अफगाणिस्तानला भारताबरोबर संबंध सुरळीत ठेवण्याची इच्छा असल्याचे तालिबानने संकेत दिले होते. कतारमध्ये तालिबानच्या नेतृत्वाखाली कार्यरत एका सदस्याने सांगितले की, भारत या उपखंडात महत्त्वपूर्ण देश आहे. तालीबान भारतासोबत अफगाणीस्तानचे पूर्वीप्रमाणे ‘सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि व्यापारी संबंध’कायम ठेवू इच्छितो.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link