तालिबानकडून भारताचा निर्यात-आयात व्यापार बंद: एफआयईओ

155

नवी दिल्ली : तालिबानने रविवारी काबुलमध्ये घुसून अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर भारतासोबतची सर्व आयात-निर्यात बंद केली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (एफआयईओ) महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी सांगितले की, तालिबानने पाकिस्तानातील मार्गातून होणारी कार्गो वाहतूक रोखली आहे. त्यामुळे त्या देशाकडून होणारी आयात बंद झाली आहे.

ते म्हणाले, आम्ही अफगाणीस्तानातील घटनाक्रमावर नजर ठेवून आहोत. तेथील आयात पाकिस्तानच्या हद्दीतून होते. आता तालिबानने पाकिस्तानकडून मालाची ये-जा रोखली आहे. परिणामी सर्व आयात बंद होईल. भारताचे अफगाणीस्तानसोबत दीर्घकाळचे व्यापार, गुंतवणूक संबंध आहेत. सहाय म्हणाले, आपण अफगाणिस्तानमधील भागीदार आहोत. २०२१ मध्ये अफगाणिस्तानला आपली निर्यात ८३५ मिलियन डॉलरची आहे. तर आयात ५१० मिलियन डॉलरची करण्यात आली आहे. व्यापाराशिवाय आपण अफगाणीस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे. अफगाणिस्तानमध्ये ४०० योजना आहेत. यापैकी काही सध्या सुरू आहेत.

ते म्हणाले, काही सामान आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन मार्गातून निर्यात केली जाते. ते चांगले आहे. काही सामान दुबई मार्गाने येते. त्यावर काम सुरू आहे. सध्या भारतीय निर्यातीमध्ये साखर, फार्मास्युटिकल्स, कपडे, चहा, कॉफी, मसाले, ट्रान्समिशन टॉवर यांचा समावेश आहे. एफआयईओचे उपायुक्त म्हणाले, आयातीमध्ये सुक्या मेव्याचा समावेश असतो. याशिवाय डिंक आणि कांद्याची आयातही केली जाते.

अफगाणिस्तानमधील बदललेल्या परिस्थितीतही व्यापारी संबंधांबाबत अधिकाऱ्यांना आशा आहे. फेडरेशन ऑफ इंडिया एक्स्पोर्ट ऑर्गनायझेसनने अफगाणीस्तानमधील बदलांमुळे सुक्या मेव्याच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. अफगाणीस्तानमधून भारतात ८५ टक्के सुक्या मेव्याची आयात केली जाते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here