तालिबानचे राज्य: अफगाणिस्तानच्या साखर आयातीला बसणार फटका

281

तालिबान ने काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि देशावर रविवारी कब्जा केल्यानंतर भारतासोबतची सर्व आयात-निर्यात बंद केली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (एफआयईओ) महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, तालिबानने पाकिस्तानच्या मार्गातून होणारी कार्गो वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे देशातील आयात ठप्प झाली आहे.

डॉ. अजय सहाय यांनी सांगितले की, आम्ही अफगाणीस्तानमध्ये सर्वात मोठे भागीदार आहोत. अफगाणीस्तानमध्ये आमची २०२१ मध्ये निर्यात जवळपास ८३५ अमेरिकन डॉलर आहे. आम्ही जवळपास ५१० मिलियन अमेरिकन डॉलरच्या सामानाची आयात केली आहे. व्यापाराशिवाय अफगाणीस्तानात आमची मोठी गुंतवणूक आहे. आम्ही अफगाणीस्तानमध्ये जवळपास तीन अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानमध्ये जवळपास चारशे योजना आहेत. त्यापैकी काही सध्या सुरू आहेत.

अफगाणीस्तान भारताकडून मोठ्या प्रमाणावर साखरेची निर्यात करतो. अशीच स्थिती कायम राहीली तर साखरेच्या निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो. भारताच्या खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या ताज्या अहवालानुसार २०२१ मध्ये साखर कारखान्यांनी ६० मेट्रिक टन साखरेची निर्यात केली. त्यातील ६ मेट्रीक टन साखर निर्यात अफगाणीस्तानला केली गेली.

चीनीमंडी न्यूजशी बोलताना इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशनचे (आयएसईसी) सीईओ अधीर झा म्हणाले, पाकिस्तानमध्ये साखरेच्या कमतरतेनंतर भारत अफगाणिस्तानला पांढरी साखर अधिक निर्यात करते. जोपर्यंत आम्हाला सकारात्मक घटनाक्रम आढळत नाही, तोपर्यंत स्थिती अशीच राहील.
मुंबईतील एका निर्यातदाराच्या मतानुसार बाजाराचा मूड खराब झाला आहे. भारताने जुलै २०२१ च्या अखेरपर्यंत २०२०-२१ या हंगामात अफगाणीस्तानला आतापर्यंत ७.८६ मेट्रिक टन साखर निर्यात केली आहे. साखर उद्योगाला साखरेचे वितरण पूर्ववत करण्यासाठी इतर खरेदीदारांचा शोध घ्यावा लागेल. जर व्यापारी संबंध निट झाले नाहीत तर इतर खरेदीदाराची गरज भासेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here